वर्धा एमआयडीसीत भंगार गोदामाला भीषण आग! प्लास्टिकसह लाकूड आगीत खाक ; कोट्यावधीचे नुकसान

वर्धा : वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवार (ता. ७) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आगीत गोदामातील भंगाराचे साहित्य तसेच प्लास्टिक अन काही लाकूड जळून खाक झाले. या आगीत जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वर्धा औद्योगिक वसाहतीतील डी २०/९ या भूखंडावर वसीमभाई यांच्या मालकीचे भंगार प्लास्टिक व लोखंडी वेस्टचे गोदाम आहे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागली. आणि पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. गोदामातून आगीचे लाेळ उठताच परिसरात खळबळ माजली. अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here