वर्धा : अवैधरित्या सुरू असलेल्या सट्टापट्टी अड्यावर पोलिसांनी 5 ठिकाणी छापा टाकून 9 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या आरोपींकडून तब्बल 2 लाख 95 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई विविध पोलिस ठाण्यांतर्गत करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट पोलिसांनी आरोपी पुरुषोत्तम गडइत (52) रा. रामनगर वॉर्ड हिंगणघाट, निलेश जामुणकर रा. हिंगणघाट, संदीप मोहता रा. जगन्नाथ वॉर्ड, विनोद जमलेवार रा. जैन मंदिर वॉर्ड आणि किरीट शेसपाल रा. जैन मंदिर वॉर्ड हिंगणघाट या आरोपीकडून मोबाइल किंमत 12 हजार 500 रुपये, ओपी कंपनीचा मोबाइल किंमत 12 हजार 500 रुपये, आय टेन कंपनीचा मोबाइल किंमत 10 हजार रुपये, ओपी कंपनीचा मोबाइल किंमत 20 हजार रुपये, दुचाकी क्र. एम. एच. 32 क्यू 4223 किंमत 50 हजार रुपये आणि दुसरी दुचाकी क्र. एम. एच. 32 झेड 41 किंत 70 हजार रुपये आणि सर्व आरोपींकडून नगदी 45 हजार 500 रुपये, असा एकूण 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमेळ जप्त करण्यात आला.
तर दुसऱ्या कारवाईत हिंगणघाट पोलिसांनी जगदिश मारोतकर (42) रा. पिंपळगाव या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य नगदी 7780, असा एकूण 7 हजार 785 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत आर्वी पोलिसांनी अशोक शेंडे (52) रा. गणपती वॉर्ड आवीं या आरोपीकडून सट्टीपट्टीचे साहित्य व नगदी 305, असा एकूण 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवळी पोलिसांनी अमित बोदडे (35) रा. सरुळ या आरोपीकडून सट्टापट्टीचे साहित्य, नगदी असा एकूण 1 हजार 42 रुपयांचा मुद्देमाळ जप्त केला. पाचव्या कारवाईत पुलगाव पोलिसांनी गजानन ठाकरे रा. वॉर्ड 5 खडकपुरा नाचणगाव या आरोपींकडून सट्टापट्टीचे साहित्य ब नगदी असा एकूण 935 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.