समुद्रपूर : वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता दुचाकीने जात असलेल्या तिघांना भरधाव ट्रकने जबर धडक दिली. यात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील कानकाटी शिवारात झाला. साहिल राजेश आडे (१९ रा. धुम्मणखेडा) व मंथन परचाके (१९, रा. पारोदी) असे मृताचे नाव असून, चंदा राजेश आडे असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
हे तिघेही सायंकाळी दुचाकीने क्र. एमएच ३२ एक्यू 3६५२ चारमंडळ येथे वाढदिवसाकरिता जात होते. यादरम्यान महामार्गावरील कानकाटी शिवारात मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने क्र. आर. जे ११ जी.बी. ७८७२ जबर धडक दिली. या धडकेत साहिल व मंथन दोघेही जागीच ठार झाले, तर चंदा आडे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने समुद्रपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे येथे प्रथमोपचार करून सेवाग्राम रुणालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.