समुद्रपूर : कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान, समुद्रपूर पोलिस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करून आरोपीच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह 2 लाख 30 हजार 700 रुपयांचा देशी- विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांच्यावतीने 30 मार्च रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आली.
देशी दारूच्या 90 एमएलच्या 180 सिलबंद शिश्या (13 हजार 500 रुपये ), विदेशी दारूच्या 180 एमएल 48 शिश्या 16 हजार 800 रुपये, बियरच्या सिलबंद18 कॅन (5,400 रुपये), एक जुनी कार क्र. एम.एच. 31 सी. व्ही. 5966 (1 लाख 95 हजार) असा 2 लाख 30 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी गोलू साठोने रा. जाम, वर्धा हा फरार झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेद्वारे वर्धा व हिंगणघाट डिव्हिजनमध्ये कोंबिंग ऑपरेशनदरम्यान, मिळालेल्या माहितीवरून समुद्रपूर पोलिस ठाणे हद्दीत नाकेबंदी करुन नमूद आरोपीवर प्रो. रेड केला असता आरोपीस पोलिस दिसताच वाहन जागीच सोडून पसार झाला.
यावेळी पोलिसांनी कारसह 2 लाख 30 हजार 700 रुपयांचा देशी- विदेशी दारूसाठा जप्त केला. आरोपीविरूद्ध समुद्रपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कामगिरी पीएसआय बालाजी ‘लालपालवाळे, गजानन लामसे, यशवंत गोल्हर, अवि बनसोड, राजेंद्र जयसिंगपूर, संजय राठोड, अमोल ढोबाळे, गोपाल बावनकर, सुभाष राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.