वर्धा : जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दारूबंदी कायद्यान्वये मोहीम राबवून जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री तसेच वाहतुक करणा-यांवर 21 आरोपींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी तब्बल 4 लाख 32 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून आवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हैबतपूर परिसरात गावठी मोहा दारू छापा टाकण्यात आला. याप्रकरणी अशोक कौलुके रा. वाठोडा हैबतपूर यांचे ताब्यातून गावठी मोहा दारू गाळण्याचे साहित्य, 10 प्लास्टीक ड्रम, कच्चा मोहा फुल, असा एकूण 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.