पवनार : येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बाबूरावजी बांगडे विद्यालयाच्या प्रांगणात शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन पवनार येथील शिवसेना (शिंदे गट) वतीने उपसरपंच राहुल पाटणकर यांनी आयोजन केले होते. यावेळी शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन, भगव्या रंगाचे फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोशात शिवजयंती साजरी केली.
ग्रामस्थांनी येथे शिवरायांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण याठिकाणी गर्दी करताना दिसत होते. यावेळी सरपंच शालिनी आदमने, ग्रामविकास अधिकारी श्री डमाळे, उपसरपंच राहुल पाटणकर, माजी पंचायत सदस्य प्रमोद लाडे, माजी सरपंच अजय गांडोळे, श्रीकांत तोटे, विशाल नगराळे, सतीश जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख संदीप हीवरे, शाखा प्रमुख किरण गोमासे, उपशाखा प्रमुख गणेश पाटील, रोशन पाटील, मनोज लाकडे, आशिष हुकले, सुरेंद्र कात्रे, किसणा भट, प्रज्वल हजारे, पिंटू ठाकरे, करन बावणे, सतीश देवतळे, वैभव हिवरे, राजू मस्करे, अमोल नगराळे, रोहन पाटणकर, समस्त शिवसैनिकांसह मोठ्या संखेने ग्रामस्थांची उपस्थिती होती.