5 लाखाचा दारूसाठा जप्त! 22 आरोपींवर पोलिसात गुन्हे दाखल

वर्धा : जिल्ह्यातील 19 पोलिस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोहीम राबवून, जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री तसेच वाहतूक करणा-यांवर एकूण 20 केसेस करून 5 लाख 9 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण 22 आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अल्लीपूर पोलिस ठाण्याअंतर्गत वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने मुखबिरकडून मिळालेल्या माहितीवरून नाकाबंदी करत मुंबई दारूबंदी कायद्यान्वये प्रो. रेड केला असता आरोपी शुभम नाईक रा. हिंगणघाट याच्या ताब्यातून 4 लाख 6 हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध हिंगणगाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here