

पवनार : येथिल धाम नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. राजेश बापूराव नगराळे वय ४५ वर्षे रा. वार्ड क्रमांक २ पवनार असे मृत व्यक्तिचे नाव आहे.
घटस्पोटानंतर राजेश हा घरी ऐकटाच राहत होता. गेल्या काही दिवसापासुन तो दारुच्या नशेत असल्याचे काहींनी सांगीतले. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याने पवनार येथील धाम नदीच्या लहान पुलावरुन धाव येत थेट नदीपात्रात उडी घेत आत्महत्त्या केली. सकाळच्या वेळी जवळपास कुणीच नसल्याने त्याला वाचविण्यास कोणीही गेले नाही. काहि वेळातच तो गंडांगळ्या खात नदीच्या खोल पात्रात बुडाला. या घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह पाण्याच्या बाहेर काढत छवविच्छेदनाकरीता पाठलिला.