

वर्धा : भारतीय डाक विभाग वर्धाच्यावतीने अधिक्षक डाकघर येथे दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संबंधिच्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल किंवा त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसतील, अशा पेन्शन धारकांच्या तक्रारींची पेन्शन आदालतमध्ये दखल घेतल्या जातील. तक्रारीमध्ये सर्व तपशिलांचा उल्लेख असावा. संबंधितांनी पेन्शन अदालतीसाठी आपली तक्रार दिनांक 23 जानेवारी किंवा त्यापूर्वी अधिक्षक डाकघर, वर्धा विभाग वर्धा यांच्याकडे पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा पेन्शन अदालतीसाठी विचार केला जाणार नाही. तक्रारदारांना अदालतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल, असे अधिक्षक डाकघर यांनी कळविले आहे.