वर्धा : येथील नवीन पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन सध्या वर्धा येथील वाहतूक नियंत्रण शाखा अँक्शन मोडवर आली आहे. या शाखेच्या पोलिसांनी मागील २४ तासांत धडक कामगिरी करून तब्बल ३४२ बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दोषी वाहनचालकांकडून एकूण २ लाख ४३ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रण शाखेवर सोपविण्यात आली आहे. तर वर्धा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे रुजू होताच हा विभाग आता बेशिस्तांवर॑ धडक कारवाई करण्यासाठी अँक्शन मोडवर आला आहे. मागील २४ तासांत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून दोषी आढळलेल्या ३४२ वाहनचालकांकडून २ लाख ४३ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूणच नवीन पोलीस अधीक्षक रुजू झाल्यापासून मनमर्जीचा सपाटा लावणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.