वर्धा : पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून गेल्या काही दिवसांपासून दारूसाठा जप्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूविक्रेत्यांची चांगलेच धाबे दणाणले आहे. दारूविक्रेते इतर अवैध व्यावसायिकांवर धाडसत्र सुरु केले आहे. दारूबंदी कायदान्वये 13 नोव्हेंबर रोजी मोहिम राबवून 22 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींकडून तब्बल 2 लाख 41 हजार 890 रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात दारूविक्रेते आणि इतर अवैध व्यावसायिक करणा-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. शहरात अनेक ठिकाणी दारूविक्री, सट्टापट्टी, जुगार आणि इतर व्यवसाय थाटले होते. मात्र, नवनियुक्त पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील दारूविक्रेते आणि इतर व्यवसाय करणा-यांवर धाडसत्र सरु केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नामवंत दारूविक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. मात्र, काही दारूविक्रेते लपूनछपून दारूविक्री करीत असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर धाडसत्र सुरु आहे. 19 ठाण्याच्या अंतर्गत मोहीम राबवून तब्बल 22 दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.