वर्धा : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाची सुनावणी दि.15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे होणार आहे. आयोगाकडे सादर केलेल्या चुनेवाले, चूनेवाला, चुनगर, कुंजडा, ठेलारी, भोयर, धोबी, परीट, वरठी, तेलगु, मडेलवार (परीट), लिंगायत आंबी व अहिर या निवेदनधारक जाती समुहांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणेचे सदस्य सचिव नरेंद्र आहेर यांनी केले आहे.