वर्धा : गेल्या तीन दशकापासून भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत पवनार येथील धाम नदीवरुन पाणीपुरवठा केल्या जातो. मात्र या गावातील कोनत्याही सुशिक्षीत बेरोजगारांना या कंपनीत काम दिल्या जात नाही. गेल्या काही महिन्यांपासुन पवनार येथील सुशिक्षीत बेरोजगारांना उत्तम गलवा कंपनीत नोकरीची संधी देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. मात्र या मागणीकडे कंपनीने सर्रास दुर्लक्ष केल्याने आज सोमवार (ता. ७) माजी सरपंच अजय गांडोळे यांच्या नेतृत्व कंपनीचे पाईपलाईन टाकण्याचे काम थांबवीण्यात आले.
भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत पवनार येथील सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी मिळावी, याकरीता वारंवार अर्ज, विनंती करण्यात आली. मात्र कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. पवनार- वरुड मार्गे या कंपनीची पाइपलाईन टाकण्यात येत आहे. हे काम तात्काळ थांबविण्यात यावे, असा प्रस्ताव पवनार ग्रामपंचायतीच्या आमसभेतील ठरावात एकमताने मंजुर करण्यात आला होता. मात्र तरीही कपंनीने पाईपलाईन टाकण्याचे काम चालुच ठेवल्याने आज हे काम थांबविण्यात आले.
उत्तम गालवा कंपनी, भुगांव या कंपनीची स्थापना झाली तेव्हापासून पवनार गावातील धाम नदी पात्रातून पाण्याचा उपसा करीत आहे. पवनार येथे त्यांचा पंपहाऊस व पाइपलाइनसुद्धा गेलेली आहे. गेल्या ३० वर्षांच्या कार्यकाळात कंपनीने पवनार येथील बेरोजगार तरुण व गावकरी यांना प्राधान्यपणे कुठल्याही प्रकारच्या नोकरीत समावून घेतले नाही. कुठल्याही प्रकराचा कंपनीचा सीएसआर फंडातून गावांमध्ये कठलेही विकास काम केले नाही.
याबाबत वारंवार कंपनीला निवेदन दिले तरी कंपनी पवनार येथील बेरोजगार तरुण व गावकऱ्यांना नोकरी देण्यात उत्सुक नाही. सद्यास्थितीमध्ये पवनार – वरुड रोड त्यांची मार्गाने कंपनीचे नवीन पाइपलाइन टाण्यास सुरुवात केली आहे. कंपनी जोपर्यंत स्थानिक रोजगार तरूण व गावकरी यांना प्राधान्यक्रमे नोकरी देण्यास व फंडातून गाव विकासाची कामे करणार नाही तोपर्यंत पाईपलाईन टाकण्याच काम होऊ देणार नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
परवानगी न घेताच पाईपलाईन टातकण्यास सुरवात…
सध्या वरुड मार्गे पवनार येथून कंपणीला पाणीपूरवठा करण्याकरीता नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. ज्या गावातून ही पाईपलाईन टाकण्यात येणार आहे त्या ग्रामपंचायचे नाहरकत प्रमाणपत्र घेने कंपनीला बंधनकारक आहे वरुड ग्रामपंचायतीच्या हद्दीतुन ही पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तरीही कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच पवनार ग्रामपंचायतीच्या हद्दीत कामाला सुरवात केली होती. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी चालू असलेअसलले काम थांबविले.