वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार! एक जखमी

सेलू : तालुक्यातील खडकी येथील दोन युवक हिंगणीमार्गे देवळी पेंढरीकडे जात असताना त्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच. 32 एपी 1003 या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दुचाकीवरील एक जागीच ठार झाला तर एक जखमी झाला. ही घटना बुधवारी 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हिंगणीनजीक देवळी पेंढरी घाटात घडली. रूपेश मधुकर राऊत (30) असे मृतकाचे तर सुनील मोतीराम कुंभरे (38) असे जखमीचे नाव आहे. दोघेही खडकी आमगाव ता. सेलू येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

सेलू तालुक्यातील खडकी आमगाव येथील रूपेश राऊत व सुनील कुंभरे सिताफळ आणायला हिंगणी जवळील जंगलात जात होते. दरम्यान देवळी पेंढरी घाटात हिंगणा रोडवर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात दोघेही खाली पडले. धडक देणारे वाहन अंगावरून गेल्याने रूपेश जागीच ठार झाला. तर सुनील रोडवर फेकल्या जाऊन जखमी झाला. रस्त्याने येणारा रोशन ठाकरे याला अपघात झाल्याचे दिसताच त्याने जखमीचे मदतीकरिता धावपळ केली. अपघाताची माहिती हिंगणा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमीला रुग्णालयात पाठविले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ताब्यात घेतला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here