

वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढत युवकाच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना २४ रोजी रात्रीच्या सुमारास ईतवारा परिसरात असलेल्या पोलीस चौकीसमोरच घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी २५ रोजी आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीला २९ रोञीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. नरसिम्हा मरकाम रा. इतवारा बाजार असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुणालयात उपचार सुरु आहे. तर घरी जात असताना त्याला अंकुश खोब्रागडे याने नरसिम्हा याला दिला. अंकुश अशोक लष्कर रा. इतवारा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चौनासिंग उर्फ गोलू सुमेरसिंग मरकाम हा रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी जात असताना त्याला अंकुश लष्कर याने अडवून शिवीगाळ करुन वाद केला. दरम्यान चौनासिंग हा काही बोलता घरी निघून गेला. मात्र, ही बाब त्याच्या भावाचा मित्र सचिन खोब्रागडे याने नरसिम्हा याला सांगितले. त्यामुळे नरसिम्हा हा अंकुशला समजाविण्यासाठी गेला. अंकुशला समजावून नरसिम्हा हा पोलीस चौकीसमोरच्या रस्त्याने जात असताना आरोपी अंकुश लष्कर याने नरसिम्हाच्या पोटात आणि पाठीवर चाकूने सपासप वार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौनासिंग याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी तत्काळ आरोपी अंकुश लष्कर याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २९ रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.