20 जनावरे ‘लम्पी’च्या विळख्यात! एक बैलाचा मृत्यू; तळेगाव परिसरातील चिंता

आष्टी (शहीद) : तळेगाव परिसरात जनावरांना ‘ल्म्पी’ या संसर्गजन्य रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली. लम्पी आजाराने एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे लम्पी आजारावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पशुपालकांनी पशु संवर्धन विभागाकडे केली आहे. तळेगाव परिसरातील 20 पाळीव जनावरे लम्पी रोगाच्या विळख्यात सापडली आहेत.

या रोगामुळे अंकुश हरीभाऊ बुले या शेतकऱ्याच्या एका बैलाचा मृत्यू झाला. दुसराही बैल ल्म्पीच्या विळख्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 3 एका बैलावर लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्या उपचारासाठी त्यांनी दहा हजार रुपये खर्चसुद्धा केल्याचे सांगितले. परंतु, तरीही त्या बैलाचा मृत्य झाला. यामध्ये त्यांचे 60 हजाराचे नुकसान झाले आहे. तर दुसर्‍या बैलाचे लसीकरण केले असूनसुद्धा दुसऱ्या बैलावरही लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. अशाच प्रकारे आणखीही अनेक पशुपालकांचे गाई, गोर्हे, कालवडी, असे एकण 20 जनावरे बाधीत असून त्यावर उपचार सुरु असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडुन सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने लम्पी रोगावर प्रभावी उपाययोजना करून पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी तळेगाव येथील पशुपालकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here