आर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्कट यार्डमध्ये शनिवारी 15 ऑक्टोबरला कापूस खरेदीचा प्रारंभ झाला असून, शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल 8059 रुपये भाव मिळाला. मे अग्रवाल ऑईल अँण्ड कॉटन इंडस्ट्रीन (प्रो. प्रा. अंकीत अग्रवाल) यांचे जिनमध्ये चेतन अग्रवाल यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता कापूस शेतमालाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकरी युनीस भाई, फारूक भाई, मदन राठोड यांच्या कापसाला प्रतिक्विंटल 8059 रुपये भाव देण्यात आला.
शेतक-यांना शाल व श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यापारी आशीष अग्रवाल, बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार, बाजार समिती कर्मचारी वृंद तसेच मे. अग्रवाल ऑइल अन्ड कॉटन इंडस्ट्रीजचे कर्मचारी, बाजार समितीचे मापारी व शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीमध्ये कापूस खरेदीवर कोणत्याही प्रकारची अडत घेण्यात येत नाही. तर मोजमाप होताच चुका-याची पुर्णतः रक्कम रोखीने आरटीजीएसद्वारे त्वरित अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफ मिळविण्यास सहकार्य होते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृर्ष उत्पन्न बाजार समिती, आवी येथे शेतीमाल विक्रीस आणून ८ बाजार समितीची योग्य काटाप्ई करूनच आपला शेतीमाल विक्र करावा, असे आव्हाहन बाजा: समितीचे प्रशासक ए. डी. चर्जन व सचिव विनोद कोटेवार यांर्न केले आहे.