उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ईलेक्ट्रीक मोपेड बाईकचे वितरण

वर्धा : स्थानिक खासदार क्षेत्र विकास योजनेंतर्गत दिव्यांगांना बॅटरीचलीत ईलेक्ट्रीक मोपेड बाईक व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या लाभाचे वितरण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, आ.समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी उपस्थित होते. स्थानिक खासदार क्षेत्र विकास निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 10 दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीचलीत ईलेक्ट्रीक मोपेड गाडी, दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत 18 भुमीहीन लाभार्थ्यांसाठी 52 एकर जमीनीपैकी प्रातिनिधीक स्वरुपात मंदा चंद्रप्रकाश विघ्ने या विधवा महिलेला जमीनीचे मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांचा सेवा पंधरवाडा दरम्यान रोजगाराच्या संधी या विषयावर लाभार्थ्यांचे मार्गदर्शन शिबिर, शिष्यवृत्ती योजना बाबत मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थ्यांसाठी व कर्मचा-यांसाठी आरोग्य शिबिर, विशेष शिबिराचे आयोजन करुन 17 कर्मचा-यांना स्थायित्व प्रमाणपत्र वितरण, विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, वैयक्तिक सुरक्षा, महिला कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर, 11 तृतीय पंथीय लाभार्थ्यांना छोटे उद्योग उभारण्याकरीता धनादेशाचे वितरण, 22 दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना व्हील चेअर वाटप केल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या 15 लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल (शहरी) योजनेच्या लाभाची प्रशासकीय मंजुरी देणे आदी कार्य केल्याबाबत सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here