पवनार : येथील धाम नदीपात्रात दरवर्षी हजोरो मुर्तींचे विसर्जन होत होते यातून धाम नदीपात्र मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होत होते. सेवाग्राम विकास आराखड्यातुन या नदीपरिसरात मुर्ती विसर्जनाकरीता विसर्जण कुंड तयार करण्यात आला मात्र हा विसर्जण कुंडच आता प्रदुषणाच्या विळख्यात आहे. मागील वर्षीपासुन साचलेला गाळ आणि वाहुन न गेलेल्या पाण्यामुळे या विसर्जण कुंडात मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले आहे. या कुडाची साफसफाई न करताच मुर्ती विसर्जणाकरीता या कुंडामध्ये पाणी भरण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
मोठ्या भक्तीभावाने गणेश मुर्तीची स्थापणा करुण त्याचे विधीवत विसर्जण केल्या जाते. नदीपात्र प्रदुषित होऊ नये याकरीता धाम नदीपरिसरात विसर्जणकुंड तयार केला. मात्र हा विसर्जणकुंड प्रदुषित असल्याने या पाण्यात मुर्ती विसर्जण करण्याची वेळ गणेशभक्तांवर प्रशासनाने आनल्याले याबाबत गणेशभक्तांमध्ये तिव्र नाराजी आहे. मुर्ती स्थापनेच्या दुसर्या दिवसापासुनच विसर्जनाला सुरवात होते. दरवर्षी प्रशासन याची तयारी करते मात्र यावर्षी प्रशासनाने चालविलेल्या या प्रकारामुळे कोणतीही व्यवस्था या कुंडाजवळ केली नाही परिणामी अनेक भक्तांनी नदीपात्रातच दीड दिवसाच्या गणेश मुर्तीचे विसर्जण कले. विसर्जणाची कोणतीच व्यवस्था नसल्याने याबाबद आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. या घटनेने अनेक गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या आहे.
हा प्रकार लक्षात येताच आम्ही या कुंडात सोडण्यात येणारे पाणी थांबविले आणि ग्रामपंचायतचे कर्मचार्यांच्या माध्यमातून कुंडाची सफाई केली आहे. सध्या या कुंडाची जबाबदारी बांधकाम विभाकडे आहे. तरीसुद्धा आम्ही याकडे लक्ष देऊन विसर्जणकुंड साफ करीत आहो.
शालीनी आदमने, सरपंच पवनार