
सिंदी रेल्वे : शहरातील पीपरा रोड लगत सप्तश्रुंगी माता मंदिर परिसरात वसलेल्या अतिक्रमणधारी झोपडपट्टीत मागील काही महीण्यापासुन अवैध दारू विक्रीला उधान आले असुन याबाबत परिसरातील नागरिकांनी पोलिसांना आळा घालण्याची अनेकदा तोंडी तक्रार केली नुकतीच लेखी निवेदनाद्वारे सुध्दा मागणी केली मात्र दारु विक्री काही थांबली नसल्याने नागरिकात रोष व्यक्त होत आहे.
शहरातील सप्तश्रुंगी माता मंदिर परिसरात पीपरा रोड लगत असंख्य अतीक्रमन धारकांनी बसतांन मांडले आहे. यातील बहुतांश रहिवासी हे बाहेरुन शहरात कामानिमित्त रोजीरोटीच्या शोधात आले होते यापैकी काहीनी येथे अस्थायी निवारा उभारला आणि पाहता-पाहता शहरातील आणि इतर बाहेरुन आलेल्यांनी येथे मोठे नगरच वसविले स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतावर डोळा ठेवून येथे पालिकेच्या वतीने रस्ते, नाल्या, दिवाबत्ती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन दिली. ऐवढेच काय तर भव्य हायमॅक्स लाईटची सुध्दा व्यवस्था करण्यात आली. परिणामता येथे सिमेंटची पक्की मकानानी आकार घेतला आहे. आता तर चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टीचा सुध्दा येथे शिरकाव झाला आणि शहरातील अवैध दारु विक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. येथे चोविस तास हा व्यवसाय मोठ्या दिमाखात सुरु असतो. यामुळे परिसरात असामाजिक तत्वाच्या लोकांचा वावर वाढला आहे.
यामुळे येथे नेहमी अश्लील शिवीगाळ, मारपीट, वादविवाद नित्याचा प्रकार झाला आहे. याचा त्रास लागुन असलेल्या लक्ष्मन नगर, शिवार्पन नगर,सप्तश्रुंगी नगर, श्रीराम नगर, कलोडे ले-आऊट आदी ठिकाणच्या रहिवाशांना होते आहे. परिणामता नागरिकांनी सिंदी पोलिसांना याबाबत अनेकदा तोंडी तक्रारारी केल्या मात्र काहीही फरक पडला नाही शेवटी परिसरातील नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांना आळा घालण्याची विनंती केली आहे. मात्र यावर सुध्दा कोणतीही कारवाई व्होवुन अद्याप येथील अवैध दारु विक्री थांबलेली नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. पोलिसांच्या अशा निष्काळजीपणामुळे येथील नागरिक वैतगले असुन संताप व्यक्त करित आहे. अशीच परिस्थिती राहली तर येथील रहिवासी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यास वेळ लागणार नाही