

वर्धा : दारूसह अवैध धंद्यांचे छोटे-मोठे उद्योग सुरूच राहणार आहे. असे उद्योग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुरू आहेत. जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी शक्य नाही. आता तुमचे सरकार आले आहे, वाटल्यास माझी बदली करून टाका, अशा भाषेत पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी अवैध धंद्यांबद्दद विचारणा केली असता उत्तर दिले, असा गंभीर आरोप आमदार डाँ. पंकज भोयर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महिला अघाडीच्या जिल्हाध्यक्ष वौशाली येरावार, भाजयुमोचे जिल्ह्याध्यक्ष वरुण पाठक, माजी नगरसेविका श्रेया देशमुख, नीलेश किटे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार भोयर म्हणाले, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सुमारे 50 वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली.