वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) रस्त्यावर अनेक ठिकाणी खडडे पडले आहे. त्यामुळे वाहतुक करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या खड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत असून या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रसुला, तिगावला जाणाऱ्या सर्व सिंदी (मेघे) रस्त्यावरून बसेस व मालवाहू गाड्या नेहमीच जात असते. या रस्त्यावर जागोजागी मोठे-मोठे खडे पडले आहे.
नागरिकांना पायदळ जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकांना अपघातामुळे अपंगत्व आले आहे. सिंदी (मेघे) येथील जयभीम बुद्ध विहार ते शांतीनगर पेट्रोलपंपा पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर खडे पडले आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या खड्यात पाणी साचले जाते. त्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्यावेळी खडुयातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. सदर रस्ता एक वर्षांपूर्वीच बनविला होता. मात्र, त्यावेळी निकृष्ट दर्ज्याचे साहित्य वापरल्यामुळे हा रस्ता उखळला आहे.
रस्त्यावर मोठ-मोठे खडडे पडले असून अपघात होत आहे. हा रस्ता बांधकाम विभागाकडून बनविला होता. मात्र, एकाच वर्षात रस्त्यावर अनेक ठिकाणी खडे पडल्यामुळे जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. संबंधित विभागाकडून आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी, पावसाळ्यात रस्त्यावर गडात पाणी साचले आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.