हिंगणघाट : कोरा येथे जाणाऱ्या स्थानिक आगाराच्या एसटी बसला नंदोरी चौकात अपघात झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसच्या काचाची तोडफोड करण्यात आली. कोरा येथे जाणार्या बस क्र. एम.एच.20 डी 9144 ही चार ते पाच प्रवासी घेऊन हिंगणघाटहून कोरा येथे जात होती. सदर बसला एम.एच. 32 बी.2242 क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. सदर हा ट्रक हिंगणघाटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचारी नितीन राजपूत, अजहर खान यांनी घटनास्थळी भेट दिली.