वर्धा जिल्ह्यातील आंदोलकांना दिल्लीत अटक

आर्वी : केंद्र शासनाकडून सैन्य भरतीबाबत आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात व ईडीचा राजकीय दुरुपयोग करण्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनात शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांच्यासह जिल्ह्यातील 46 सत्याग्रहिंना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

विशेष पोलिस आयुक्‍त सागरप्रित हुडा यांच्या पथकाने काँग्रेस आमदार गणेश घोगरा, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अगवाल व इतर नेत्यांसह 178 पक्ष कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम 65 आणि फौजदारी दंड संहिता 144 अंतर्गत ताब्यात घेतले. दिल्लीच्या जंतरमंतर येथे 1000 पर्यंत लोकांना प्रदर्शनासाठी जमावाची परवानगी देण्यात आली होती. जमावाची संख्या अधिक झाल्यामुळे याठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला असूनही महाराष्ट्रतून शैलेश अग्रवाल यांच्यासह आलेल्या 16 आंदोलकांनी पोलिसांना नजुमानता प्रदर्शनात सहभाग नोंदविला. त्यांच्या मागोमाग काँग्रेस आमदार गणेश घोगरा व इतर 160 लोकांनी याठिकाणी बळजबरीने प्रदर्शन सुरु केल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष पोलिस आयुक्तांना पाचारण केले.

यावेळी त्यांनी शैलेश अग्रवाल, गणेश घोगरा, आर. सी. पांडे यांच्यासह 178 आंदोलकांना ताब्यात घेत मंदिरमार्ग पोलिस स्टेशनला स्थानबद्ध केले. वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांच्यासह अमीन शेख, किशोर मात्रे, राहुल देवगडे, सुशिल दवे, रमेश तेल्हांडे, सुरेश काळे, रवि डेकाटे, सुभाष काळे, रीतेश कडू, बाळा किनकर, आशुतोष रणनबरे, भीमा आत्राम, खान ‘पठाण, सतीश पांडे, दगडू बारसागडे व अविनाश पवार यांनी या सत्याग्रहात सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here