

पवनार : गावामध्ये मोकाट डुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या मुक्त संचारमुळे धान्य वाळविणे, घराची दारं उघडी ठेवणे, रस्त्यावर वाहन चालविणे कठीण झाले आहे. घराच्या दारासमोर, रस्त्यावर कुठेही ते घाण करून ठेवतात त्या मुळे रस्त्याने चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. शिवाय त्याची दुर्गंधी सुद्धा खूप पसरते. सध्या पावसाळा सुरू आहे डुकरांचा घाणीमुळे गावात डायरिया, मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू सारखे आजार डोके वर काढू शकतात त्यामुळे यावचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
याआधीच्या अनेक आमसभेमध्ये यावर निर्बंध घालण्याचे ठराव घेण्यात आले आहे. परंतु परिस्थिती जैसे थे आहे. ही आमसभेत घेतलेल्या ठरावाची अवहेलना न्हावे का? असा सवाल आता ग्रामस्त विचारत आहे. आमसभेत घेतलेल्या ठरावावर आपण काय कारवाई केली बाबत विशेष आमसभा घेऊन गावकऱ्यांना सांगा असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हण्टले आहे. ही डुकरे जर कुणाच्या मालकीची असतील तर त्यांचे वर सुद्धा कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु तसे न होता त्याचा नाहक त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
जर आपण या डुकरांचा बंदोबस्त केला नाही व यामुळे गावात जर काही अनुचित घडले तर त्या साठी ग्रामपंचायत प्रशासन दोषी असेल अशी आमची धारणा होईल. त्यामुळे आपण योग्य ती कारवाई करून गावकऱ्यांची डुकराच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे.