हिंगणघाट : राहुल गांधी यांच्या ईडीकडून होत असलेल्या तपासाच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा मंगला ठक यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसने निषेध व्यक्त केला. तहसील कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले. केंद्र सरकार काँग्रेस नेत्याविरोधात षडयंत्र रचत आहे. राहुल गांधी यांना वारंवार ईडीच्या नोटिसा पाठवून त्रास दिला जात आहे. खोटे आरोप करून त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौकशी सुरू आहे, हे अत्यंत चुकीचे आहे, आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. मंगला ठक यांनी याबाबत नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनात संघटनेच्या व काँग्रेसच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
Home ◼️ संपादकीय तहसील कार्यालयावर महिला काँग्रेसची धडक! ईडीचा निषेध, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी