वर्धा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि.18 जुन रोजी सकाळी 11 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात इच्छुक व पात्र युवकांनी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता अवघड यांनी केले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा येथे आयोजित या रोजगार मेळाव्यात सुझकी मोटर्स, गुजरात यांच्याकडे रिक्त असलेली आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फिटर, टर्नर, वेल्डर, ईलेक्ट्रीशियन, मशिनिष्ट, डिझल मॅकेनिक, ट्रॅक्टर मॅकेनिक, सिओई ऑटोमाबाईल पदे तसेच विराट सिक्युरिटी ग्रुप हिंगणघाट व एमडीएसएचजी कंपनी मसाळा येथील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व ईच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे मुळ शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र व एम्प्लॅायमेट कार्ड घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता पर्यंत उपस्थित राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.