

वर्धा : सायकलने ड्युटीवर जात असलेल्या 50 वर्षीय इसमाला भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकी क्र. एम.एच. 29 बी.जे. 2548 च्या चालकाने जोराची धडक दिली. ही घटना 6 जून रोजी रात्री 10.20 वाजताच्या दरम्यान, मौजा नेरी पुनर्वसन सालोड – हिरापूर येथे घडली. या अपघातात सायकलस्वार वामन गंगाराम वागदे (50) रा. गौरक्षण वॉर्ड, वर्धा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अपेक्षा वामन वागदे हिच्या तक्रारीवरून दुचाकी क्र. एम.एच. 29 बी. जे. 2548 च्या चालकाविरुद्ध सावंगी मेघे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.