
वर्धा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या नेतृत्वातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी हिंगणघाट तालुक्यातील काही कृषी केंद्रांचीही धडक तपासणी केली. या तपासणी मोहिमेदरम्यान पाच कृषी केंद्रात विक्रीसाठी असलेल्या कपाशी बियाण्यांबाबतचे प्रिन्सिपल सर्टिफिकेटच नसल्याचे पुढे आल्याने या कपाशी बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी निर्गमित केला आहे. विक्री बंदी लावण्यात आलेले हे कपाशी बियाणे कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.