वर्धा : पैशाच्या कारणातून झालेल्या वादात संतापलेल्या पुतण्याने काकाच्या डोक्यावर काठीने मारहाण करीत जखमी केले. जुनी वस्ती सेवाग्राम येथे ही घटना २४ रोजी घडली. चंद्रकांत वैजनाथ ताकसांडे हा घरी चिवडा खात बसला असताना पुतण्या नयन श्रीकांत ताकसांडे हा तेथे आला त्याने चंद्रकांत याला ३ हजार रुपये मागितले. चंद्रकांत याने पैसे देण्यास नकार दिला असता संतापलेल्या नयन याने काठीने चंद्रकांतच्या डोक्यावर मारहाण करीत त्यास जखमी केले. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.