जातीवाचक शिवीगाळ! चौघांविरुद्ध ‘अँट्रासिटी’ दाखल

वडनेर : पेपर वाटण्यास गेलेल्या व्यक्‍तीला जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना धनोरा गावात घडली असून याप्रकरणी २० रोजी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध अँट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

प्रशांत हरिदास लोखंडे (४०) रा. धानोरा याचे किराणा दुकान असून तो गावात पेपर वाटण्यासाठी गेला असता आरोपी सागर राजू बोंदरे हा त्याच्याजवळ आला आणि तु आमच्या धर्माबद्दल काय म्हणाला, असे म्हणत वाद करून जातीवाचक शिवीगाळ करणे सुरू केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास प्रशांत लोखंडे हा घरी असताना पुन्हा सागर राजू बोंदरे, सूरज राजू बोंदरे, राजू माणिक बोंदरे, छाया राजू बोंदरे हे प्रशांतच्या घरासमोर आले आणि शिवीगाळ करुन वाद करीत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रशांतने वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध अँट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here