पवनार : ज्यांचे पालकत्व हरवले आहे अशा एकाकी, निराधार मुलांना काही सुखाचे क्षण अनुभवता यावे म्हणुन पवनार येथील डॉली नरेश मुंगले या युवतीने आपला अठरावा वाढदिवस वर्धा येथील आसमंत स्नेहालय सेवाश्रम, वर्धा या अनाथाश्रमात साजरा करीत आपुलकीने त्यांना सुखाचा घास भरवित समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
वाढदिवस म्हण्टल की तरुणाईमध्ये खुप उत्सूकता असते आणि त्यातून महागडे कपडे, पार्टी, डीजे अशा अनेक गोष्टींवर अमाप पैसा खर्च केला जोतो मात्र १८ वर्षीय डॉलीने आपला वाढदिवस साध्या पद्धतीने आणि अनाथाश्रमात साजरा करण्याची ईच्छा आपल्या आई वडिलांसामोर व्यक्त केली. अनेक सामाजीक कार्यात पुढाकार घेणार्या तिच्या आई-वडीलांनी अनाथाश्रमात वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
लागलीच कुटूंबातील सदस्यांनी अनाथाश्रमाचा शोध घेत वर्ध्यातील आसमंत स्नेहालय सेवाश्रम येथील संचालकांची परवानगी घेत येथील चिमुकल्या बालकांसोबत केक कापुन डॉलीने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी या बालकांना मिष्टान्न वाटप करुन त्यांचा आनंद द्विगूणीत केला.