मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : शहरातील प्रतिष्ठित टि. व्ही. फ्रिज व्यवसायीक तसेच शेतकरी असलेले संजय कवडु कलोडे यांच्या मौजा हिवरा शिवारातील रेेल्वे रुळालगतच्या पुलाजवळील शेतातील गोठ्याला शुुक्रवारी ( ता.२९)च्या मध्यरात्री दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहीती सकाळी उघडकीस आल्यावर आग विझविण्यासाठी घटनास्थळी सर्वानी एकच धाव घेतली. मात्र आगीचे रौद्ररूप ऐवढे भयानक होते की, गोठ्यातील शेती साहित्य आणि बैल जोड्यांना वर्षभर पुरेल ऐवढे वैरन जळून खाक झाले. सुदैवाने सर्व जनावर उन्हाळ्या असल्याने गोठ्यात न बांधता बाहेर बांधल्याने जनावरे वाचली.
सविस्तर वृत्त असे लगतच्या हिवरा शिवारात शहरातील शेतकरी संजय कलोडे यांची मोठी शेती आहे. ओलीताची जमीन असल्याने असंख्य वर्षापासुन येथेच त्यांचा अस्थानी स्वरुपाचा टिनचा मोठा गोठा आहे नेहमीप्रमाणे आज सुध्दा सालकर्यानी दिवसभर शेतातील कामे केली सांयकाळी चारापाणी करुन सात वाजता घराकडे आले. मध्यरात्री दरम्यान गोठ्याला आग लागली सकाळी नेहमीप्रमाणे सालगड्डी दुधधारा काढण्यासाठी शेतात गेला असता आगीचे रौद्ररूप पाहुन सालगड्डी घाबरला आणि त्याने मालक कलोडे यांना माहीती दिली लागलीच शहरातुन असंख्य जनानी कलोडे यांचे शेताकडे धाव घेतली मात्र तेव्हा पर्यंत ऊशीर झाला होता.
आगीत कुटार ७० गोने, ७० कट्टे कांदा, चार्जिग इलेक्ट्रिक फवारनी पंप ४ नग, दिड क्विंटल सरकी ढेप, तीन क्विंटल कुटाना, एक स्पिंकर सेट, १५ बॅग सिमेंट, १०० नग टिनपत्रे आदी तसेच शेती साहित्याची राख रांगोळी झाली एकुन अंदाजित चार लक्ष रुपयाचे नुकसान झाले. घटनास्थळी पोहचुन सिंदी पोलीस विभागने घटनेची नोंद तर सेलु तालुका महसुल विभागाने पंचनामा केला असुन ४ ते ५ लक्ष रुपयाच्या नुकसानीची नोंद केली आहे. आग लागण्याच्या कारणाचा आणि इतरही बाबीचा पोलिस कसुन तपास करीत आहे.
हा अपघात नसुन घातपातच असल्याचे कलोडे यांचे मत
सालगड्डी शेतातुन परत येतांना दुभत्या गाईचे वासर नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधुन ठेवल्याचे सांगतो मात्र वासर गोठ्यातुन बाहेर सोडुन होते यामुळे अज्ञाताने आग लावताना गोठ्यातुन वासर सोडुन आग लावली असल्याची शंका मालक संजय कलोडे यांनी व्यक्त केली.