थकीत कर्जाचा भरणा केल्यास 50 टक्के सवलत! महामंडळाची लाभार्थ्यांसाठी योजना

वर्धा : एकरकमी परतावा योजनेंतर्गत महामंडळाच्या लाभार्थीना थकीत कर्जांच्या व्याजदरात 2 टक्के सुट देऊन कर्जखाते बंद करण्याची एकरकमी परतावा योजना राबविण्यात आली. परंतु, सदर योजनेला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे थकीत कर्ज प्रकरणात वसुली व्हावी, याकरीता संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थ्यास आता व्याज रकमेत 50 टक्‍के सवलत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

महामंडळाच्या बहुतेक सर्व जिल्हयामध्ये कर्ज परतफेडीची मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून, त्यांच्याकडून कर्जवसुलीसाठी सर्व वैैैैैधानिक प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत. राज्यात मागील दोन वर्षांपासून कोविड 19 ची गंभीर परिस्थिती उद्भवली असून, त्यातून काही लाभार्थ्यांचे व्यवसाय बंद झालेले आहेत. त्यामुळे थकीत कर्ज प्रकरणात कर्ज वसुली व्हावी, याकरीता संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणा-या लाभार्थीस थकीत व्याज रक्‍कमेत 50 टक्के सवलतीची एक रकमी परतावा योजनेस 31 मार्च 2023 पर्यंत मंजूर प्राप्त झाली आहे. सर्व योजनांतर्गत कर्ज खाते बंद करु इच्छिणा-या लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील, असे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here