वर्धा : सेवाग्रामकडून वर्ध्याकडे भरधाव येणाऱ्या पांढर्या रंगाच्या कारने अचानक पेट घेतला. कारच्या आगीत डीजे साहित्य जळून खाक झाले. ही घटना २७ रोजी बुधवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात यश आले. सेवाग्राम येथून सोहळा आटोपून कार वर्ध्याकडे येत असतानाच अचानक कारच्या डिझेल टँकला आग लागल्याचे दिसले. कारमधील युवकांनी लगेच कारमधून डीजेचे साहित्य कारबाहेर काढले. चालकाने वाहनातून पळ काढला. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करून वाहनाने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच वर्धा पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमक बंबांच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. आगीत संपूर्ण वाहनसह वाहनातील डीजेचे साहित्य जळून खाक झाले.
Home ◼️ संपादकीय वर्ध्यात रात्री ‘बर्निग कार’चा थरार! डीजे साहित्य जळून खाक; न्यायालय परिसरासमोरील घटना