

आकोली : नजीकच्या माळेगाव (ठेका) येथील शेतकरी शेषाराव विठोबा लेंडे यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये शेतीपयोगी साहित्य आणि जनावरांचे वैरण जळून राख झाले. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. शेषराव लेंडे यांच्याकडे साडेपाच एकर शेती असून, शेतीलगतच वनविभागाची जमीन आहे. लेंडे दूपारी शेतातील काम आटोपून बैलजोडी गोठ्यात बांधून घरी जेवण करायला गेले होते.
यादरम्यान वनविभागाच्या जागेतूनच आग शेतापर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही आग गोठ्यापर्यंत येऊन गोठ्यातील ७० स्म्रिंकलरचे पार्ईप, दोन इंजन, बैलबंडी, वखर, नांगर या साहित्यासंह पूर्ण वैरण जळाले. यावेळी गोठ्यातील बांधून असलेले दोन बैलजोडी मोकळी होऊन पळाली. त्यामुळे बैलजोडी बचावली. या आगीमध्ये शेषराव यांचे मोठे नुकसान झाले असून, आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.