वर्धा : जिल्ह्याचे तापमान सोमवारी सर्वोच्च 45 अंश एवढे नोंदविले होते. तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी तापमानात घट होत 44.4 अंश एवढे नोंदविले गेले. पण, पुन्हा त्यात वाढ होऊन 45 अंशावर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढू लागल्याने उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यातच वर्धेकरांना मे-हिट जाणवत असून, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागला आहे. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून रुमाल, टोपी, छत्रीचा वापर केला जात आहे. उन्हाचे चटके लागत असल्याने शहरातील अनेक सस्त्यावरही वाहनांची वर्दळ कमी झालेली आहे. सोमवारी वातावरणात बदल जाणवल्याने तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस तापमान वाढू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.