
वर्धा : आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत वार्षिक एक लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जात असून, महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेशी जोडल्या गेलेल्या रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. यामुळे गरीब आणि गरजूंना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे दिसून येत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, या योजनेंतर्गत ज्या कुटुंबीयांतील सदस्यांची नोंदणी झाली असेल त्यांना गोल्डन कार्ड दिले जाते किंवा ज्यांच्याकडे प्रधानमंत्र्यांचे पत्र आहे अशांना गोल्डन कार्ड दिले जात आहे. महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी संजीवनी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या आरोग्य मेळाव्यादरम्यान ५१५ जणांना हेल्थकार्ड वाटप करण्यात आले आहे.
कोणत्या रुग्णालयात मिळनार उपचार?
महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा पद लाभ सावंगी रुग्णालय, सेवाग्राम रुग्णालय, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय, लोढा हॉस्पिटल, अरिहंत डायलेसिस सेंटर, आर्वी उपजिल्हा रुग्णालय, डॉ. राणे रुग्णालय, कारंजा ग्रामीण रुग्णालय, वर्धा सामान्य रुग्णालयात या योजनेचा लाभ दिला जात असल्याची माहिती आहे.