आम आदमी पक्षाकडून निषेध! सरकारविरुद्ध घोषणाबाजी; इंधन दरवाढीविरुद्ध भोंगा आंदोलन

वर्धा : आम आदमी पार्टीच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 21 एप्रिल रोजी सायंकाळी इंधन दरवाढी विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्या भाषणाच्या क्लिप भौोंग्यावरून वाजविण्यात आल्यात. महागाई व सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्याबरोबर देशात पेट्रोल 122 रूपये, डिझेल 105 रुपये, व गैस 1050 रुपये असे भाव केंद्र सरकारने वाढ वाढविले. जेव्हा मोदी सरकार म्हणते पेट्रोल-डीझेल भाववाढ आमच्या हातात नसून आंतर-राष्ट्रीय बाजारातील क्रुडऑंइलच्या भावावर आधारित आहे, असे असताना पाच राज्याच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार कडून पेट्रोलचे रेट10रुपये कमी केले होते.

गोरगरीब जनता तर गॅस बंद करुण चुलीवर स्वयंपाक करायला भाग पाडाले आहे. याचा कुठेतरी विरोध व्हायला पहिजे म्हणून आज आम आदमी पार्टीकडून संपूर्ण विदर्भात महागाई विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले. त्या भाषणाच्या विलप आज भोग्यावरून बाजविण्यात आल्यात. महागाई व सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. काही ठिकाणी महंगाईचे चॉकलेट वाटप करण्यात आलेत. अनेक प्रश्‍न आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेत.वर्धा येथे आप जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला प्रमोद भोयर, प्रदीप न्हळे, मनोहर विरूळकर, तुळसीदास वाघमारे, योगेश ठाकुर, मयुर राऊत, संदीप डंभारे, संदीप भगत, राठोड, रमेश गुरनुले, संकेत कुंभारे, श्रीकांत दौड, माणिकराव भगत, जयसिंग, योगेश ठाकुर, सुरेश मकेश्‍वर, कमलेश न्हळे, सदानंद थूल, देवानंद चौधरी, कलाल, किरण पट्टेवार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here