ऑफर्सच्या नावाखाली फसवणूक! ग्राहकांनी सतर्कता बाळगावी

वर्धा : काही दिवसांत ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेकांचा ऑनलाइन खरेदीकडे कळ वाढला आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यासाठी विविध कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विवध प्रकारची प्रलोभने दिली जात आहे. याच संधीचा फायदा घेत मोबाइलवर लिंक पाठवून ऑनलाइन खरेदीच्या नावावर ग्राहकांची फसवणूक होत आहे. ऑनलाइन खरेदी करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने वस्तुंची खरेदी केल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठविली जाते. लिंक डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल असा संदेशही पाठविला जातो.

अशा प्रलोभनांना बळी न पडता अज्ञात वेबसाइटवरून पाठविण्याता आलेल्या लिंक डाऊनलोड करू नयेत, अशा लिंक डाऊनलोड करताच बँक खात्यातील रक्‍कम कमी झाल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन युक्त्या शोधून काढत असतात. त्यासाठी अनेकदा महिलांना तुमच्या घरी ऑनलाइन पार्सल पाठवित आहे. आता तमच्या मोबाइलवर ओटीपी येईल तुमचे बँकेत केवायसी नाही. तुमचा आधार नंबर सांगा, ओटीपी सांगा मोबाइल नंबर सांगा असे फोन करून माहिती मागण्याचे प्रकार सुरू आहे. अनेकांना तर लाखो रुपयांची लॉटरी लागली आहे, असे कॉलही येतात. एखादी वस्तू खरेदी करताना त्या कंपनीच्या वेबसाइटची खातरजमा करावी. आपली वैयक्तिक माहिती अन्यथा ओटीपी नंबर, आधारकार्ड नंबर, मोबाइल नंबर कोणालाही देऊ नये, असे फोन आल्यास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here