वर्धा : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दर वाढविल्याने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. सिलिंडर हजारी गाठली आहे. परिणामी महिला गॅस ऐवजी चुलीकडे वळल्या आहे. सिलिंडरच्या दरात वारंवार वाढ करीत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. परिणामी पुन्हा एकदा घरातून चुलींचा धूळ निघायला सुरवात होणार.
सर्व सामान्यांचे बजेट बिघडल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आधुनिक युगात महिलांना वरदान ठरत असलेले सिलिंडरचे दर वाढल्याने बजेट लावायचे तरी कसे असा प्रश्न महिलांसमोर उभा ठाकला आहे. गॅस सिलिंडर आत घरोघरी पोहचले असुन सामान्य कुटुंबापासून ते गरीबांच्या घरातसुध्दा गॅसचा वापर होत आहे. गॅस सिलिंडर ही जीवनावश्यक बाब असताना यामध्ये होणारी दरवाढ जीवघेणी ठरत आहे.