वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. अशातच मंगळवारी वर्धा जिल्ह्याचे तापमान तब्बल ४४.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. तापमानात कमालीची वाढ होत असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे. हवामान खात्याच्या वतीने विदर्भात उष्णलाटेची शक्यता वर्तविली असून सध्या जिल्ह्याच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. अशातच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आल्या आहेत.