वर्धा : उन्हाळा आला की आंब्याची चव केव्हा एकदा चाखतो असे होते. सामान्यपणे अक्षय तृतीयेपासून आंब्यांचा आस्वाद घेतला जातो. बाजारात आंबे विक्रीस आले आहे. मात्र हवामानाचा फटका आंबा उत्पादनाला बसल्याने यंदा आंब्याची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. सध्या बाजारात आंबे 200 रु. किलोने विकले जात आहे. परंतु आंब्याचे दर गगनाला भिडल्याने सर्व सामान्यांना आंब्याची चव घेणे कठीण झाले आहे. बाजारपेठेत आंबे विक्रीला आले
आहे. परंतु आंब्याची विक्री किंमत पहाता ग्राहक पाठ फिरवित आहे.
यंदा आंब्याची आवक 50 टक्क्यांनी घटल्याने सोन्याच्या दरात आंबा विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे आंब्याची चव चाखणे काय तर त्याकडे पहाणेही कठीण झाले दिसते. निसर्गाच्या लहरीपणामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे एक महिना आंब्याचा हंगाम उशिरा आला आहे. त्यातच उत्पादन घटल्याने यावर्षी आंब्याची किंमत बाजारात वाढली आहे. दरवर्षी 100 रु किलोदराने मिळणा आंब्याकरिता सध्या 200 रु. मोजणी लागत आहे. यामुळे ग्राहक आंबे घेण्याकडे पाठ दाखवित आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांर गरीबांच्या चवीवर पाणी फेरले आहे.