आर्वी : मागील अनेक वर्षांपासून नाल्या आणि रस्ते उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाकडून लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या कन्नमवार नगर व एलआयसी परिसरातील महिला- पुरुषांनी सोमवार 18 एप्रिलला नगरपालिका कार्यालयावर धडक दिली. मागील 25 ते 30 वर्षांपासून राहत असले तरी या परिसरामध्ये अजुनपर्यंत नाल्या व रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांना कमालीचा त्रास त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन रस्ते व नाल्या करण्याबाबत वारंवार अवगत केले. असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या स्स्त्यावरून सद्यस्थितीत पायी चालण्याची परिस्थिती नसून, पावसाळ्यात याच सस्त्यावरून आम्हाला ये-जा करावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यात एलआयसी कॉलनी व कन्नमवार नगर येथील काही रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले होते. परंत. ड्रेनेज सिस्टम पद्धतीने हा रस्ता मधोमध खोदून चाळणी करून ठेवल्याने खडीकरण झालेला रस्तासुद्धा खड्डेमय बनला आहे. त्यामुळे या दोन्ही परिसरातील लोकांना पायी चालणेसुद्धा कठीण झालेले आहे. या आंदोलनात प्रतीक भिमटे, कमलेश गुल्हाने, अनिकेत बडनेरकर, सूरज भुयार, सुरेखा थोरात, सुलोचना पखाले, निर्मला मसदकर, शोभा देशमुख, किरण शेंद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला-परुष सहभागी आले होते.