देवळी : प्लास्टिक नको ही मानसिकता निर्माण करणे आज काळाची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे कार्य तरूण तरूणीच करू शकतात. सायकल अभियानाद्वारे निर्माण केलेली जागरूकता खरच प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचाय डॉ. गणेश मालधुरे यांनी स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात 16 एप्रिल रोजी सायकल अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. स्थानिक 21 महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन अंतर्गत एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना पथक व रोव्हर-रेंजर पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लास्टिक निर्मूलन’ करण्याकरिता सायकल रॅली द्वारे देवळी शहरात जनजागृती करण्यात आली. यशस्वी ते करीता रोव्हह आसीफ शेख, संकेत हिवंज, निलेश थुल, रंजीत येलोरे, प्रतीक क्षीरसागर, गायत्री निरगुडे व छात्र सैनिकांनी सहकार्य केले.
Home ◼️ संपादकीय प्लास्टिक टाळण्यासाठी सायकल रॅलीद्वारे जनजागृती! एनसीसी, रोव्हर्स रेंजर्सचा पुढाकार