

हिंगणघाट : रॅलीत नाचताना धक्का लागल्याने दोघांनी युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कटरने वार करीत जखमी केले. ही घटना १४ रात्री रात्रीच्या सुमारास रुबा चौकात घडली. याप्रकरणी १५ रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत प्रतीक जुमडे (रा. म्हाडा कॉलनी, तुकडोजी वॉर्ड) हा त्याच्या मित्रांसोबत रॅलीत नाचत असताना आदर्श गोलाईत, कुणाल राजूरकर यांनी त्याला धक्काबुक्की केली. दरम्यान, अनिकेतने धक्का का देता, असे हटकले असता आदर्शने कटरने वार करीत जखमी केले, तर कुणालने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले, या प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.