ओव्हरलोड टिप्पर नालीत फसला! रस्त्यावर पडले भगदाड; नुकसान भरपाई कोण देणार?

अल्लीपूर : परिसरातून दिवसरात्र खुलेआम वाळूची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने प्रकार दिवसेदिवस वाढत आहे. अशातच ओव्हरलोड टिप्पर रस्त्यावरील नालीत फसल्याने मोठे भगदाड पडले. यात नालीचे नुकसान झाले असून भरपाई कोण देणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गुरुवारी भरदिवसा एम.एच. ३२ ए. जे. १३६४ क्रमांकाचा टिप्पर हिंगणघाट तालुक्‍यातील वाळू घाटावरुन ओव्हरलोड वाळू भरून जात होता. हा टिप्पर डी. पी. नागपाल याच्या मालकीचा असून, सुधीर काळे हा वाहन चालवित होता. हा टिप्पर अल्लीपूर येथील बसस्थानकासमोरील नालीत फसल्याने नालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकारावरून या मुख्य नालीचे कामही सदोष झाल्याचे उघड झाले आहे. पण, आता या नालीची नुकसानभरपार्ड कोण देणार, ती दुरुस्त कोण करणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here