

वर्धा : बहुजन समाज पार्टी च्या वतीने दि.१४/४/२०२२ ला मोहन राईकवार यांचे अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती व बहुजन समाज पार्टीचा ३८ वा वर्धापन दिन संपन्न झाला.यावेळी सकाळी पक्ष ध्वजारोहण करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, मान्यवर कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून आरोग्य शीबिराला सुरुवात करण्यात आली. डॉ. गणेश जवादे एम.बी.बी.एस. ऑर्थो., व डॉ अविनाश ताकसांडे एम.बी.बी.एस.एम.डी. मेडीसिन, यांच्या उपस्थितीत हे आरोग्य शिबीर संपन्न झाले. या वेळी मोहन राईकवार जिल्हा अध्यक्ष यांनी समयोचीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव अनोमदर्षी भैसारे यांनी संचालन केले तर आभारप्रदर्शन जिल्हा सचिव दीपक भगत यांनी केले.
सायंकाळी विहारातील अभ्यासिकाना एम पी एस सी.स्पर्धा परीक्षेचा संच भेट देण्यात आला व विद्यार्थ्यांना नोट बुक व पेन वाटप करण्यात आले. विशेष आकर्षण महापुरुषांच्या वेशभूषेत प्रतीक सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने तथागत बुद्ध, महात्मा फुले, संत कबीर, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, फातिमा शेख या महापुरुषांचे जिवंत पुतळे तयार करण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणादायी कोटेशन चा वापर करून सुंदर सूत्रसंचालन सक्षम दीपक भगत यांनी केले. या वेळी जिल्हा प्रभारी सुरेश नगराळे, जिल्हा परिषद सदस्य मनीष पुसाटे, जिल्हा संघटक दिनेश वाणी, मिलिंद शंभरकर, सिद्धार्थ ढेपे, विजय ढोबळे, ॲड.अभिषेक रामटेके, जयंत वासनिक शहर अध्यक्ष, डॉ विद्या राईकवार, रश्मी भाईसारे, अरविंद पाटील, विवेक गवळी, अतुल रुईकर, आकाश जयस्वाल, अविनाश सोमनाथे, सुधाकर जूनघरे, गणेश सहारे, सोपान कांबळे ओमप्रकाश भालेराव, जगदीश कांबळे, सुनील रंगारी इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.