जुन्या वादातून केले चाकूचे वार! स्टेशनफैलातील घटना; जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

वर्धा : जुन्या वैमनस्यातून व्यक्‍तीच्या शरीरावर चाकूचे सपासप वार करून गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना स्टेशनफैल परिसरात ९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेल्सन डिक्रुजा असे जखमीचे नाव असून आरोपी राजू उर्फ येडा जयस्वाल हा फरार होण्यात यशस्वी झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे.

नेल्सन आणि राजू येडा हे दोघेही स्टेशनफैल परिसरातीलच रहिवासी आहेत. दोघेही एकमेकांना ओळखतात. त्यांच्यात जुना वाद असल्याने नेहमी दोघांत वाद व्हायचे. शनिवारी रात्रीच्या समारास आरोपी राजू उर्फ येडा याने नेल्सनच्या शरीरावर धारदार शस्त्राने पाच ते सात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नेल्सन गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ नागपूर येथील मेडिकलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपीचा शोध पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे यांची चमू घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here