वर्धा : अल्पवयीन मुलाला सरकारी दवाखान्याच्या खुल्या असलेल्या रुममध्ये नेऊन आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना देवळी येथील जुना सरकारी दवाखान येथे 6 एप्रिल रोजी 10 वाजताच्या दरम्यान घडली. देवळी येथील कंटीगच्या दुकानासमोर आरोपी अमय दिपकराव झाडे (वय 20) हा फिर्यादीच्या 12 वर्षीय मुलाला म्हणाला, तू माझ्या बहिणीचा हात पकडला होता, तेव्हा अल्पवयीनने हात पकडला नाही असे म्हटले.
त्यानंतर अल्पवयीन मुलगा घड्याळाच्या दुकानात जात असताना आरोपी हा ठाकरे चौक, देवळी येथे भेटला. त्यानंतर अल्पवयीन मुलाला जुना सरकारी दवाखान्याच्या खुल्या असलेल्या रुममध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना अल्पवयीन मुलगा पळून गेला. सदर पीडित मुलाने घरी येऊन आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमय दिपकराव झाडे ( वय 20) रा गजानन नगर वार्ड, क्र.5 वर्धा हल्ली मुक्काम कुसुमबाई हागे रा. देवळी यांचे घरी, याच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात पोक्सो अँक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास देवळी पोलिस करत आहेत.